सांगली : कडकनाथ घोटाळा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्तांना योग्य तो न्याय द्यावा, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकून आंदोलन केले.
यावेळी भाजप सरकारचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना खासगी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करत मार्गातून बाजूला केले. यात चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडकनाथ घोटाळा प्रकरणी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानंतर पोलीसही कार्यकर्त्यांच्या मागावर होते; मात्र त्यांना चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पलूस-ताकारी मार्गावर एका शेतात बसून, अचानक मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर केलेल्या या गनीमी आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
दरम्यान मुख्यमंर्त्यांनी सांगलीतील सभेमध्ये कडकनाथ प्रकरणाला बगल देत, केवळ दुष्काळी भागाला पाणी देवू, असे आश्वासन दिले.
- 8 व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारामध्ये होईल घसघशीत वाढ! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले
- Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या
- लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?
- Tata Power Share : टाटा पॉवर शेअरची झेप; ब्रोकिंग फर्मने दिली चकित करणारी टार्गेट प्राईस