भाजप नेत्याची जीभ घसरली, भर सभेत म्हणाले काँग्रेसचे आमदार ‘हिजडे’!

Ahmednagarlive24
Published:

बंगळुरू : कर्नाटकात येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री असलेले के.एस. ईश्वरप्पा यांनी रविवारी एका जनसभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची वर्तणूक ही अगदी हिजड्यासारखी असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

या जनसभेत बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, ‘आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसचे काही आमदार भारतीय जनता पक्षात येण्यास इच्छुक होते; परंतु आपण निवडणूक हरलो तर काय करायचे, अशी त्यांना भीती वाटत होती.

जवळपास ५० हजार मुस्लिम आपल्याला मतदान करणार नाहीत, अशी भीती त्यांना वाटत होती. यावरून त्यांची ही वर्तणूक अगदी हिजड्यासारखी वाटते.’ इतकेच बोलून ईश्वरप्पा गप्प बसलेले नाहीत, तर फक्त देशभक्त असलेला मुसलमानच भारतीय जनता पक्षाला मतदान करू शकतो.

जे देशाच्या विरोधात आहेत, देशद्रोही आहेत आणि पाकिस्तान समर्थक आहेत, असे लोक भाजपात येण्यास आणि भाजपाला मतदान करण्यास लाजतात किंवा भितात, असेही म्हटले आहे.आपण आपल्या आयुष्यात एका विशिष्ट समाजाला (मुस्लिम) खूश करण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही किंवा कधीही त्यांना कसल्याही शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

असे असतानाही मला जिंकण्यासाठी आवश्यक असलेली पुरेसी मते पडली आणि मी निवडून येत मंत्री झालेलो आहे, असे ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे. असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची त्यांची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यातच नव्हे,तर देशभरात चर्चेला आलेले होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment