राधाकृष्ण विखे झाले आक्रमक, म्हणाले घोषणाबाज सरकारची फ्युजही आता उडाली !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- सरसकट वीज बील पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना शॉक दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरु आहेत. बिघाडी सरकारच्‍या फसव्‍या धोरणाचीच होळी रस्‍त्‍यावर उतरुन करण्‍याची वेळ आली आहे.

घोषणाबाज सरकारची फ्युजही आता उडाली असल्‍याची टिका भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. वीज वितरण कंपनीच्‍या वतीने ग्राहकांना देण्‍यात आलेल्‍या सरसकट बीलांची होळी आणि सरकारच्‍या फसव्‍या धोरणांचा निषेध करण्‍यासाठी आ.विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्‍यात आले. वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपा कार्यकर्त्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

याप्रसंगी जेष्‍ठनेते काशिनाथ विखे, एम.वाय. विखे, किसनराव विखे, चेअरमन नंदू राठी, सुभाषराव विखे, संचालक संजय आहेर, सिनेट सदस्‍य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, रावसाहेब साबळे, अशोक धावणे, विक्रांत विखे, खंडू धावणे, संतोष विखे, अनिल विखे, शंकर विखे यांच्‍यासह शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

सरकारच्‍या धोरणावर टिका करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये सामान्‍य माणसाला वीज वितरण कंपनीने सरसकट बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भूर्दंड टाकला आहे. या सरसकट वीज बिलांची वसुली वितरण कंपनींने तातडीने थांबवावी अशी मागणी करुन त्‍यांनी सांगितले की, १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्‍याची मागणी सरकारकडे कोणीही केली नव्‍हती. परंतू संवग लोकप्रियतेसाठी महाविकास आघाडी कडुन केवळ घोषणा आणि आश्‍वासने दिली जात आहेत. उर्जा मंत्र्यांनीच स्‍वत:च्‍या घोषणेपासुन पळ काढला आहे.

या घोषणेची पुर्तता करुन तातडीने १०० युनिट पर्यंत वीजबील माफ करण्‍याचा आग्रह सरकारकडे आम्‍ही धरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. महाविकास आघाडी सरकारची मागील वर्षभरात फक्‍त घोषणाबाजी सुरु असुन, कर्जबगारी मात्र शुन्‍य आहे. सरकारच्‍या कोणत्‍याही धोरणात आणि निर्णयात स्‍पष्‍टता नाही. केवळ निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांपासुन जनतेचे लक्ष विचलीत करण्‍याचे काम मंत्र्यांकडुन केले जाते. वीज बिल माफीची नागरीकांची मागणी दुर्लक्षीत व्‍हावी म्‍हणून अचानक या सराकरने घाईत उर्जा धोरण जाहीर केले.

तुमच्‍या तिजोरीत जर पैसाच नाही तर मग घोषणा करता कशाला? अशा प्रश्‍न उपस्थित करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, काही घडले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्‍याचा प्रयत्‍न असुन, राज्‍यातील जनतेशी केलेल्‍या विश्‍वास घातामुळे या सरकारची फ्यूजच उडाली असल्‍याची खरमरीत टिका आ.विखे पाटील यांनी केली आहे. लोणी खुर्द येथेही वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्‍यात आला.

याप्रसंगी डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, बापूसाहेब आहेर, पंचायत समिती सदस्‍य संतोष ब्राम्‍हणे, डॉ.हरिभाऊ आहेर, राहुल घोगरे, नितीन घोगरे, मच्छिंद्र घोगरे, मच्छिंद्र आहेर, रविराज आहेर आदिंसह शेतकरी, ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येंने सहभागी झाले होते. राहाता तालुक्‍यातील विविध गावांमध्‍येही भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात आक्रोश व्‍यक्‍त केला आहे.

कोट – शाळा सुरु करण्‍याबाबतही सरकारमधील मंत्र्यांची कोणतीही एकवाक्‍यता नाही. शिक्षण मंत्र्यांच्‍या निर्णयालाच राज्‍यमंत्री विरोध करतात, शिक्षकांच्‍या कोवीड टेस्‍टसाठी कोणतीही सुसज्‍ज यंत्रणा नाही. सरकार पुर्णत: गोंधळलेल्‍या परिस्थितीत असुन, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्‍यामध्‍ये झालेली संभ्रमावस्‍था दुर करण्‍यात सरकारला पुर्ण अपयश आले असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment