चोरट्यांच्या उपद्रवामुळे व्यापारी हवालदिल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारीचा आलेख उंचावत होता, मात्र हा आलेख खाली आला असून आता जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे.

चोरी, लुटमारी, दरोडा आदी वाढत्या घटनांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच राहुरी शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत असलेले व्यापारी चोरांच्या उपद्रवामुळे हवालदिल झाले आहेत.

चोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, राहुरीतील व्यापाऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा राहुरी तालुका व्यापारी असोसिएशनतर्फे देण्यात आला.

सोमवारी पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यात आले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, अनिल कासार, विलास तरवडे,

कांता तनपुरे, प्रवीण दरक यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, शुक्रवारी (ता. 20) रात्री बालाजी मंदिरासमोर नगर-मनमाड रस्त्यानजीक अशोक लालबागे यांचे शेती औजारे व दुरुस्तीचे दुकान फुटले.

त्यात, 45 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. त्याच रात्री राहुरी स्टेशन रस्त्यावरील नव्याने सुरू झालेले ‘वश्याट बाजार’ हे दुकान चोरट्यांनी फोडले.

दरम्यान राहुरी पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News