कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करणार !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं,” राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पुढील दोन दिवसांत घोषणा केली जाईल.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी केली जाणार आहे.

यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल असं टोपे म्हणाले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने

उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नसल्याचे टोपेंनी स्पष्ट केले. दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे. चौपाटय़ा, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने करोना प्रसार वाढत आहे.

पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध करणं, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणं, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे,

मास्क न वापरणाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणं, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेऊन याची घोषणा केली जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment