ज्यांनी पक्ष सोडला त्याची अवस्था वाईट झाली- सत्यजित तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडला त्यांची सध्या खूप वाईट अवस्था आहे.

त्या जागा आता तरुणांनी घेतल्या आहेत. असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे. संगमनेरातील अमृता लॉन्स येथे रविवारी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना तांबे म्हणाले कि, काँग्रेसमध्ये मानसन्मान असलेल्या अनेक नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना भाजपमध्ये कोणताही मान-सन्मान नसून त्यांना पाचव्या-सहाव्या रांगेत बसावे लागते आहे. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच झाली आहे.

पक्षांतराच्या मुद्द्यवरून तांबेंनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले, काँग्रेस पक्षाला समृद्ध परंपरा असून ती राज्यघटनेशी बांधील अशी विचारधारा आहे.

पक्षाने अनेक अडचणी पाहिल्या. यातून पुन्हा उभारी घेतली आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे. आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी आहे. जन माणसांचा काँग्रेसवर मोठा विश्वास आहे. असे प्रतिपादन तांबे यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment