पैशाच्या देवाण घेवाणच्या कारणातून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-पैसा संपत्ती यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेकदा संपत्ती हीच वादासाठी कारणीभूत ठरल्याचे अनेक घटनांतून दिसते.

तसेच देणे – घेण्यातून देखील अनेकदा वादाच्या घटना घडतात, असाच काहीसा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी दांडके व गजाने बेदम मारहाण करण्यात आली.

ही घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,

या घटनेतील फिर्यादी व साक्षीदार हे दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजे दरम्यान घरासमोर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी संकेत दिनेश पवार,

ईश्वर नामदेव टिळेकर, महेश दिनेश पवार व आकाश बापूसाहेब शिरसाट सर्व राहणार कोल्हार खुर्द तालुका राहुरी हे आले आणि उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानुसार चंद्रकांत भाऊसाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत वरील चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved