अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-5 वर्षांपूर्वी कर्जत गावाचे शहरामध्ये रूपांतर करण्याचा शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला. मी जो शब्द देतो तो पूर्ण करत आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.
कर्जत नगर पंचायतच्या वतीने शहरांमध्ये समर्थ गार्डन व शहा गार्डन या दोन गार्डनचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. यावेळी माजीमंत्री राम शिंदे बोलत होते. दरम्यान पुढे बोलताना शिंदे म्हणाले कि, तालुक्याच्या विकासासाठी आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला.
रस्ते दळणवळण पाणी या सर्व कामे केली. परंतु तरीही नागरिकांनी व खासकरून युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या व्यक्तीला मदत केली. आज मतदारसंघातील सर्व जनतेची व नागरिकाना खऱ्या अर्थाने राम शिंदे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असे आता जनता उघडपणे बोलू लागले आहे.
परंतु काळजी करू नका ही चूक पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये दुरुस्त करता येणार आहे. आपला माणूस हा आपलाच असतो.यामुळे नाटक करणाऱ्यांच्या मागे न राहता प्रमाणे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनतेने उभे रहावे. असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नगरपंचायत आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवडून द्या असे आवाहन देखील राम शिंदे यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved