ना. विजय औटी व अनिल राठोड यांना पक्षांतर्गत आव्हान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मुलाखती आज घेण्यात आल्या दरम्यान नगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर शहरातून विजय औटी व अनिल राठोड यांना पक्षांतर्गत नेत्यांनीच आव्हान उभे केल्याने त्यांची वाटचाल बिकट ठरण्याची शक्यता आहे.

शहरासह जिल्ह्यातील बारा मतदार संघात शिवसेनेच्या आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्या इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत शिवसेना भवन येथे दिल्या.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या मुलाखती पार पडल्या असून नगर शहरातून माजी मंत्री अनिल राठोड, पारनेरसाठी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, कर्जत – जामखेडमध्ये जिल्हा प्रमुख राजेंद दळवी, नगरसेवक बाळासाहेब बोहाटे आदिंनी मुलाखती दिल्या.

मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून युती झाल्याचे युतीच्या नेत्यांनी जाहीर केले होते.

मात्र मागील निवडणुका पाहता युती न झाल्यास उमेदवारांची अडचण निर्माण होवू नये यासाठी शिवसेनेने नगर शहरासह जिल्ह्यातील बारा मतदार संघात मुलाखती घेतल्या.

शिवसेना भवन येथे सकाळी अकराच्या सुमारास मुलाखतीस सुरूवात झाली. नगर शहरातून माजी मंत्री अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, अनिल शिंदे यांनी मुलाखती दिल्या आहेत.

पारनेर मतदार संघात आ. विजय औटी यांना विरोध करत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी मुलाखत दिली. राहुरी – नगर – पाथर्डी मतदार संघात उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, राजेंद्र म्हस्के,

जामखेड – कर्जतमधून दीपक शहाणे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, दीपक शहाणे, शेवगाव मतदार संघातून अ‍ॅड. अविनाश मगरे, रामदास गोल्हार, अशोक थोरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिल्या.

संगमनेर, नगर, राहुरी, अकोले, जामखेड, पारनेर, नगर शहरासह जिल्ह्यातील बारा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आजी – माजी आमदारांनी मुलाखती दिल्या, मुलाखती दरम्यान जिल्हा उपप्रमुख गिरीष जाधव, नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

या मुलाखतीनंतर उमेदवारी कोणाला मिळणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले असून युती न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढण्याची मात्र जोरात तयारी केली असल्याचे दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment