अद्यापही विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- शासनाच्या आदेशाने सोमवारपासून (ता.23) टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना मिळाल्या असल्या तरी शाळा सुरू हपऊनही विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे.

उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अद्यापही पालक वर्गामध्ये कोरोनाची भीती असलेली साफ दिसून येत आहेत. यामुळेच शाळा सुरु होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसून येत आहे.

नेवासा तालुक्यातील कौठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात नववी व दहावीच्या वर्गात १२० पैकी ४० विद्यार्थी उपस्थित होते, तर ८९ पालकांनी संमतीपत्र सादर केले होते.

शाळेच्या प्रवेशद्वारावरच सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ठरावीक अंतरावर चौकोन, थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमिटर व सॅनिटायझर असल्याने शाळेतील नेहमीचे वातावरण बदललेले दिसून आले.

मुख्याध्यापक उद्धव सोनवणे माईकवरून कोविड-१९ संदर्भात घ्यावयाची दक्षता याबाबत सूचना देत होते. शाळेच्या प्रथमदर्शनी कोविड-१९ संदर्भात घ्यावयाची काळजीबाबत बोर्ड लावण्यात आला होता.

सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मास्क परिधान करून एका बाकावर एकच अशी बैठक व्यवस्था केली होती. शाळेत येताना विद्यार्थ्यांनी मास्क लावणे, जेवण घरूनच करून येणे, पाणी बाटली बरोबर ठेवणे, शक्य असल्यास सॅनिटायझरची बाटली बरोबर ठेवणे, शाळेत शारीरिक अंतर पाळावे, शाळेबाहेर फिरू नये, असे सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment