अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- “मी जरी हंग्याचा असलो, तरी मी या तालुक्याचा आमदार आहे, बरोबर आहे ना ? अजूनही काही लोकांना हे मान्य नाही की आमदार आहे म्हणून !” असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजेश चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. बाजार समितीचे माजी संचालक शैलेंद्र औटी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पारनेर नगरंपचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभुमिवर मा. आ. विजय औटी यांनी आमच्या तरूणांच्या मनगटात रग आहे, आमचा विकास करण्यास आम्ही समर्थ आहोत. आमचा विकास करण्यासाठी बाहेरच्यांची गरज आहे असे मला वाटत नाही असे सांगत आ. लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान केले होते.

तर चंद्रकांत चेडे यांनी आमदार साहेब का करता आमच्या गावाची बदनामी ? असा प्रश्‍न उपस्थित करीत नगरपंचायत निवडणूकीत बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये असे सांगत आ. लंके यांच्यावर टिका केली होती. पारनेर शहरात झालेल्या कार्यक्रमात आ. लंके यांनी नाव न घेता दोघांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, अ‍ॅड.राहुल झावरे, राम पठारे, नंदकुमार देशमुख, विजेता सोबले, संभाजी औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. सादीक राजे, शिवाजी महाराज रेपाळे,

अजित जेउरकर, जयप्रकाश साठे, दादा शेटे, अरूण आवारी, बलभिम कुबडे, सचिन नगरे, माजी सरपंच वैजयंता मते,अभय गट, बाळासाहेब नगरे, शिवाजी पठारे आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe