अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.
नुकतेच चोरटयांनी नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील शिवशांती कापड दुकान फोडून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी केली.
याप्रकरणी बिभिषण शंकर सुरवडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना उशिरा रात्री घडली असल्याची माहिती मिळते आहे.
मात्र, दुकान मालकाला चोरी झालेल्या मालाची खातरजमा करण्यास विलंब झाल्याने मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. जीन्स, रुमाल, साडी, टाॅप, बनियन, टी शर्ट, टॉवेल असे कपडे चोरट्यांनी लांबवले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved