अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर)पुकारलेल्या लाक्षणिक संपाला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
लिपिकवर्गीय कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी होणार नसले, तरी या संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारने ठोस पावले उचलावी या मागणीसाठी संपाला पाठिंबा असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षेच ठेवावे, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून असलेल्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी, कर्मचारी भरती करावी, पदोन्नतीतील आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा,
कंत्राटीकरण रद्द करावे, प्रलंबित देयकांसाठी अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी होणाऱ्या लाक्षणिक संपाला संघटनेचा पाठिंबा आहे.
लिपिकवर्गीय कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी होणार नसल्याने या दिवशी लिपिकवर्गीय कर्मचारी कार्यालयीन कामकाज बंद ठेवणार नाहीत. अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved