प्रवरानगर :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात मात्र प्रथमच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच शासकीय पातळीवर आदिवासी आरोग्य संदर्भात धोरण निश्चिती करता यावी या उद्देशाने ‘ट्रायबेकॉन’ ही राष्ट्रीय परिषद घेण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने होत असलेल्या या ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे उदघाट्न केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांच्या हस्ते करण्यात येणार असून,
या प्रसंगी राज्य आदिवासी विकास मंत्रालयाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा, गडचिरोली सोसायटी फॉर एज्युकेशन रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग, बेंगलोर येथील व्ही,जी,के,के, अँड करूणा ट्रस्टचे सचिव डॉ. एच. सुदर्शन ,
जबलपूर आय सी एम आर चे संचालक डॉ. अप्रूप दास, दिल्ली येथील जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चंद्रकांत लहारीया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम जयराज हे उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसीय परिषदेकरिता महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल तसेच पॉन्डीचेरी आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासह एकूण २० राज्यांचे सुमारे तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून आदिवासी समाजासाठी काम करणारे सुमारे ३० तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेदरम्यान आदिवासी संस्कृती व त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. यासह सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाणांचेही प्रदर्शन याठिकाणी असणार आहे.
- रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ काम केलं नाहीत तर, कार्ड होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम आणि प्रोसेस
- अजून थोडा पाऊस आला असता तर मुळा धरणाऱ्या बाबतीत घडला असता ‘हा’ ऐतिहासिक विक्रम, मात्र थोडक्यात संधी हुकली
- भारतातील सर्वाधिक श्रीमंत आमदार महाराष्ट्रात ! अंबानी, अदानीला देतो टक्कर; राज्यातील ‘या’ आमदाराकडे 33830000000 रुपयांची संपत्ती
- काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?
- तृप्ती देसाईंच्या आरोपांनंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी देसाईंच्या विरोधात बदनामीचा गुन्हा केला दाखल!