अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नवऱ्याने बायकोकडं तिचा मोबाईल मागितला असता त्याचा राग आल्याने बायकोने नवऱ्याच्या डोक्यात मसाला वाटण्याचा पाटा मारून डोके फोडले.
तर मुलीलाही लाथाबुक्याने मारून तोंड दाबून बेशुद्ध पाडले. या खळबळजनक प्रकरणी नवऱ्याच्या फिर्यादीवरून बायकोवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.
याप्रकरणी रोहिदास गंगाधर जाधव, वय ३५ रा. वेल्हाळे गावठाण, ता. संगमनेर यांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी संतोषी रोहिदास जाधव, रा. वेल्हाळे गावठाण हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिदास जाधव या नवऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे की, काल ११.३० च्या सुमारास रहात्या घरी पत्नी संतोषी जाधव हिच्याकडे तिचा मोबाईल मागितला असता तिने मोबाईल देण्यास नकार दिला.
त्यातून दोघांमध्ये भांडण झाले. संतोषी हिने भांडणाचा राग मनात धरुन घरातील मसाला वाटण्याचा दगडाचा पाटा पती रोहिदास याच्या डोक्यात व कानावर मारुन डोके फोडले.
यावेळी त्यांची मुलगी भांडण सोडविण्यास आली असता संतोषी हिने तिला लाथाबुक्याने मारून तिचे तोंड दाबून तिच्या डोक्यात पाटा लागल्याने ती लहान मुलगीही बेशुद्ध पडली. दोघा जखमींवर संगमनेर शहरातील तांबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सपोनि साबळे हे पुढील तपास करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved