शिंदे साहेब मागील दहा वर्षात किती महीला सक्षमीकरण कार्यक्रम केले ?

Ahmednagarlive24
Published:

कर्जत :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या तर्फे  “गाठूया शिखर नवे” हा कार्यक्रम बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी कर्जत तालुक्यातील जिजाऊ मंगल कार्यालय चिलवडी रोड राशिन येथे आयोजित करण्यात आला होता .

ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळातच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिला मतदारांना खुश करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा संदेश मतदारांत गेला,आणि यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना सोशल मिडीयावर रोषाचा सामना करावा लागला. 

मागील दहा वर्षात किती महीला सक्षमीकरण कार्यक्रम केले साहेब.दहा वर्षा पासुन प्रतीनिधीत्व करता आत्ता तर मंत्री होतात आपण,तरीही जामखेड-कर्जत चा विकास काही दिसला नाही,

देश स्वतंत्र झाल्यापासुन रस्ते-पाणी-लाईट याच गोष्टी अजूनही गावा गावात आपण राजकारणी लोकं देऊ शकत नाहीत हीच जनतेच्या दुर्भाग्याची गोष्ट आहे अशी प्रतिक्रीया एका युजरने ह्या पोस्टवर केली होती.

असले डमी कार्यक्रम घेवून आता निवडून येता येणार नाही, तसेच आता कोणालाही आणून उपयोग नाही,साहेब ते दिवस गेले,आता फक्त आपला राम राम घ्यावा आता फक्त रोहित दादाच अश्या प्रतिक्रिया व्यक्त करत मतदार संघातील तरुणांनी आपले मत व्यक्त केले.  

पहा पालकमंत्री राम शिंदे यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे.

राम शिंदे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

राम शिंदे हे सत्ताधारी असूनही या मतदारसंघात विकास पुरेशी विकास कामे झाले नाही. आज दुष्काळी परिस्थिती आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, याकडे मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ही खदखद लोकांच्या मनात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment