अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- नुकतेच संगमनेर मध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
यावेळी मयताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे.

संगमनेर येथील भोलाणे हॉस्पिटलमध्ये संगीता अंकुश पठारे (३५, बिरेवाडी) ही महिला शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. भुलीच्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलसमोर गर्दी केली.
शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. संगीता पठारे गर्भाशयाचा आजारामुळे शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती.
गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी भुलीचे इंजेक्शन दिल्यावर तिची प्रकृती खालावली. उपचारासाठी दुसरीकडे नेताना तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी केली.
चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांना शांत केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved