अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण होत आहे या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली असून मुलाखतीचे प्रोमो त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट केले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले? असा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तसेच राऊतांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारत असताना उद्धव ठाकरेही जशास तसं उत्तर देताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ज्यांना ज्यांना मुलबाळं आहेत, त्यांनी आरशात बघावं, अशा प्रकारचा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार…आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ज्यांना ज्यांना मुलबाळं आहेत, त्यांनी आरशात बघावं, तुम्हालाही मुलबाळं आहेत,
तुम्हालाही कुटुंब आहेत, तुम्हीही धुतल्या तांदळासारखे नाही, जर मी मागे लागलो तर मग…अशा गंभीर इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved