अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-सध्या सोशल मीडियावरील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक रहस्यमय धातूचा खांब दिसला आहे.
बातमीनुसार, हा खांब अमेरिकेच्या वाळवंटातील उटाह येथे आढळून आला आहे. असे सांगितले जात आहे की ते पूर्ण धातूचे आहे. हा चमकदार, त्रिकोणीय स्तंभ दक्षिणी उटाहच्या लाल खडकांजवळ दिसला.
लोकांमध्ये सध्या अशी चर्चा आहे कि, हा खांब एलियन्सने लावलेला आहे. नंतर त्याचा तपास लावला गेला. त्यामध्ये हे उघड झाले की हा धातूचा मोनोलिथ आहे. पण हे मोनोलिथ तिथे कोणी ठेवले आहे हे अद्याप समजू शकले नाही.
मात्र, एजन्सीने सोमवारी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ते म्हणाले की व्यवस्थापित सार्वजनिक जमिनीवर परवानगी न घेता संरचना किंवा कला स्थापित करणे बेकायदेशीर आहे, आपण कोणत्या ग्रहाचे आहात याची पर्वा नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved