त्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर नगर परिषदेची शहर हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचे कॉन्ट्रॅक्ट एका ठेकेदाराला देण्यात आले होते.

मात्र नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेकेदार परवडत नाही म्हणून अर्धवट कामे सोडून गेल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली .

यावर बोलताना श्रीरामपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी सांगितले कि, या ठेकेदारावर विरोधात तातडीने गुन्हा दाखल करणार आहे.

तसेच नवीन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर काढून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.

श्रीरामपूर नगर परिषदेची शहर हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कामाच्या निविदा प्रक्रिया बाबत विचार विनिमय करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाने प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

तसेच यावेळी झालेल्या चर्चेत किरण दुनिया,मुक्तार शहा ,प्रकाश ढोकणे, भारती परदेशी, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, राजेंद्र पवार ,जितेंद्र छाजेड यांनी सहभाग नोंदवला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment