कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या तालुक्यात शासकीय कोविड रुग्णालय सुरु

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे.

त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा वेग घेतल्याच्या दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन बेड सह इतर सुविधानियुक्त शासकीय कोविड रुग्णालय आज अधिकृत सुरु झाले आहे.

तालुक्यात शासकीय खानापुर कोविड सेंटर व अगस्ती कारखान्याचे वतीने सुरु केलेल विठ्ठल मंगल कार्यालयातील कोविड सेंटर सुरु आहे. तेथे कोरोना तपासणी व प्राथमिक उपचार केले जातात माञ रूग्णाची प्रकृती अधिक असल्यास त्यावर उपचार व ॲक्सीजन बेडची गरज असल्यास त्यांना संगमनेर येथील शासकीय अथवा खाजगी रूग्णालयात जावे लागत असे.

माञ काही दिवसांपूर्वी शहरातील डॅा.मारूती भांडकोळी यांनी आपले हरिश्चंद्र रूग्णालयातील वरच्या मजल्यावरील २५ बेड ही शासकीय कोविड उपचारासाठी देण्याची तयारी दर्शवली व त्यानुसार उदघाटनही झाले होते. माञ त्या रुग्णालयासाठी लागणारी साहित्य ,

औषधे,डॅाक्टरर्स, सफाई कर्मचारी सह इतर स्टाफ यांची उपलब्धता शासकीय स्तरावर करण्यात आली, त्यामध्ये रोटरी क्लब व इतर समाजसेवी संस्था यांनी मदत केल्याने आज हरिश्चंद्र रूग्णालयात शासकीय कोविड रुग्णालय सुरु झाले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment