अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील कोपर्डी रस्ता जागोजागी खचला आहे. रस्त्यावर खडीचे ढीग साचल्याने प्रवाशांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. जाधव वस्तीनजीक रस्त्याचा निम्मा भाग खचल्याने प्रवास धोक्याचा झाला आहे.
कुळधरण येथे मोठी बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर मोठी दळणवळण सुरू असते. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. या मार्गावर गावांचे अंतर तसेच वेग मर्यादा दर्शविणारे फलक लावण्यात आले होते.
मात्र अनेक दिवसांपासून हे फलक गायब झाले आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्तासुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खोलवर खड्डे पडले
असून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत. अनेक दिवसापासून या डांबरीकरण रस्त्याला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत ही प्रवाशांची मागणी आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved