राहुरी, नगर व पाथर्डी ही तालुक्याची गावे मतदारसंघात असताना दहा वर्षांत एकही नवीन पाणी योजना कार्यान्वित करता आली नाही. पालिकेच्या सुधारित पाणी योजनेत व मंजुरीत ज्यांचे काडीचेही योगदान नाही, असे नि्क्रिरय आमदार शिवाजी कर्डिले शहरात फलकबाजी करून स्वत:चा सत्कार घडवून आणत आहेत.
योजनेचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद व केविलवाणा आटापिटा करीत आहेत. योजनेविषयी समोरासमोर चर्चा करण्याची तयारी आहे, असे आव्हान नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
पालिका कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करताना तनपुरे म्हणाले, सुधारित पाणी योजनेचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी तांत्रिक मान्यतेसाठी पाठविला. जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात नगर, नाशिक, ठाणे, मुंबई येथे अहोरात्र फेऱ्या मारल्या.
चारवेळा प्रस्तावातील त्याच-त्या त्रुटींची पूर्तता केली. अडथळ्यांची शर्यत पार करून नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयात प्रस्ताव पोहचविला. मुख्यमंर्त्यांची भेट घेऊन योजनेला मंजुरी देण्याची विनंती केली. दळण दळले, स्वयंपाक केला, घास भरविण्याचे काम मुख्यमंर्त्यांनी केले. त्यांनी पक्षविरहीत भूमिका घेऊन योजनेला मंजुरी दिली.
त्यांचे आभार; परंतु कर्डिले यांचे काडीचेही योगदान नसताना श्रेय घेण्यासाठी ते स्वत:चा सत्कार घडवून आणतात. आयत्या बिळावर नागोबा होण्याचे काम करतात. हे रूचणारे नाही. लोकप्रतिनिधी म्हणून कर्डिले यांचे काम निराशाजनक आहे, अशी टीका करून ते म्हणाले, राहुरीतील बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. लघु औद्योगिक वसाहतीचा पाणीप्रश्न आहे. तेथे एकही मोठा उद्योग नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. ब्राम्हणीसह पाच गावे पाणी योजनेला मंजुरी दिल्याची घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात काम सुरू नाही.
स्वत:च्या बुऱ्हाणनगरला आठ दिवसातून एकदा पाणी मिळते. दहा वर्षांत मतदारसंघाचा विकास खुंटला. विधानसभेत पाच वर्षांत फक्त दोन वेळा तोंड उघडले. मुळा धरणातून बीडला पाणी देण्याचे घाटत आहे. त्यावरही हे गप्पच आहेत.
- गुड न्यूज ! दोन नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा, मुंबई आणि पुणेसाठी…
- MSRTC News : दरवर्षी 5000 नवीन लालपरी बसेस ! प्रत्येक आगारात चार्जिंग स्टेशन उभारणी,असे आहेत महत्वाचे निर्णय
- 8th Pay Commission: मोदींचा अनपेक्षित निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
- Shirdi Breaking : शरद पवार गटाला मोठा धक्का ! शिर्डीत होणार ‘त्या’ आमदारांचा पक्षप्रवेश
- एक महिना चहा पिलं नाही तर शरीरात काय काय बदल होतात ?