अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-राहूरी परिसरातील गुंजाळे भागात राहणाऱ्या एका २३ वर्ष वयाच्या सज्ञान तरुणीला काल भरदिवसा ११.३० च्या सुमारास देवकर वस्ती जवळील बसस्थानका जवळुन लखन नावाच्या नगरच्या आरोपीने पळवून नेले.
या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून या धक्कादायक प्रकाराची माहिती अशी की, गुंजाळे परिसरातील एक भाऊसाहेब नावाचे इसम त्यांच्या पत्नीस वांबोरी येथील दवाखान्यात नेत असताना
देवकर वस्तीजवळ बसथांब्याजवळ आले असता आरोपीने भाऊसाहेब यांच्या नात्यातील तरुणीच्या मोटारसायकलला त्य़ाची दुचाकी आडवी लावली, त्यावेळी भाऊसाहेब गाडीहून पडले
त्याचवेळी आरोपी लखन याने तरुणीस त्याच्या दुचाकीवर बसवून अज्ञात कारणासाठी पळवुन नेले. याप्रकरणी भाऊसाहेब यांच्या फिर्यादीवरून आरोपी लखन कर्जुने, रा.एमआयडीसी नगर व त्याचा एक साथीदार अशा दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved