श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राज्यभरात कॉँग्रेस पक्षाच्या मुलाखती सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल श्रीरामपुरात विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी १९ उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
शहरातील संगमनेर रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये या मुलाखती झाल्या. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा संघटक बाबासाहेब कोळसे, रियाज पठाण, नगरसेवक मुख्तार शाह, भारत भवार आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून कॉँग्रेसचा उमेदवार जिंकलेला आहे. स्व. जयंतराव ससाणे दोन वेळा आमदार होते. त्यानंतर मतदारसंघ राखीव झाला. नंतर भाऊसाहेब कांबळे यांनी दोन पंचवार्षिक या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
आताही कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. काल मुलाखती दिलेल्या उमेदवारांमध्ये अगोदर शिवसेनेकडून इच्छुक असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,
काँग्रेसचे राष्ट्रीय युवक सरचिटणीस हेमंत ओगले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, डॉ. वसंतराव जमधडे, भाऊसाहेब डोळस, प्रा. प्रताप देवरे, पी. एस. निकम, कार्लस साठे, विजय खाजेकर, भारत तुपे, अशोक बागुल, छायाताई सरोदे, प्रभाकर कांबळे, विलास खाजेकर, युवराज बागुल, बापुराव त्रिभुवन, सुरेश जगधने, अॅड. गोविंद अमोलिक, के. सी. शेळके आदींचा समावेश आहे
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार