नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीमध्ये फसण्याची भीती नसली तरी जागतिक अर्थव्यवस् थेला येत्या दोन वर्षांमध्ये आर्थिक मंदीचा फटका बसू शकतो, अशी ४० टक्के शक्यता आहे, असे मत जे. पी. मॉर्गनच्या एका प्रमुखाने मुलाखतीत व्यक्त केले आहे.
अनेक विश्लेषकांचे मत आहे की, जागतिक आर्थिक मंदी येत असून २००८ च्या तुलनेत जगभरा तली शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होऊ शकेल. भारतीय बाजाराबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांमध्ये जागतिक आर्थिक मंदी येण्याची शक्यता ४० टक्के आहे, असे वाटते.
धोरण तयार करणारे अजूनही आर्थिक मंदीकडे पाहाता व्याजदरामध्ये कपात करत आहेत. सरकारी खर्चांमध्ये वाढ होत आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा जागि तक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
जागतिक स्तरावरील पुरवठा साखळीत भारताचे योगदान मात्र कमी असून येथील अर्थव्यवस्थेत क्रयशक्ती हा मोठा घटक आहे व त्यामुळे गुंतवणुकीला व अन्य काही घटकांना येथे पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधा ही बाब व्यापारापेक्षा अधिक महत्त्वाची असून त्यामुळेच भारत मंदीमध्ये अडकेल, असे वाटत नाही. जागतिक मंदी आली तर त्याचा परिणाम भारतावर वाईट पडेल यात शंका नाही, मात्र त्यामुळे भारताच्या निर्यातीत घट होईल व आयात वाढण्यामुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
भारतातील सूक्ष्म अर्थव्यवस्थेतील तपशील व अन्य बाबी अजून मिळत्याजुळत्या आहेत. त्यात स्थिरता आहे, ही चांगली बाब आहे. महागाई दर नियंत्रणात असून त्यामुळे व्याजदर कमी करण्यामध्ये मदत मिळत आहे.
वित्तीय अनुशासनावर केंद्र सरकार लक्ष देत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये भारताच्या वृद्धीत घट झाली, पण या वर्षाच्या दुसऱ्या ि तमाहीमध्ये या स्थितीतून उभारी घेणे सुरू होईल, मध्यम कालावधीमध्ये ही उभारी घेण्याची स्थिती चांगली असेल.
परदेशी गुंतवणूक वाढ होत असून त्यात भारत अधिक यशस्वी झाला तर गुंतवणूक चक्रामध्ये गती येऊ शकते. यावर नजर ठेवणे आवश्यक आहे.
- एटीएमचा वापर करा आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा! जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
- Vodafone Idea चा सर्वात स्वस्त रिचार्ज ! 2GB डेटा, कॉलरट्यून आणि बरंच काही…
- पहिल्यांदा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर कार्डवरील छुपे खर्च माहीत करून घ्या! नाहीतर कपाळाला हात मारण्याची येईल वेळ
- 1 वर्ष कालावधीकरिता करा ‘या’ 5 स्टॉकची खरेदी अन मिळवा 60 टक्क्यांपर्यंत परतावा! जाणून घ्या यादी
- How To Buy Melania Coin : भारतात ट्रम्प आणि मेलानिया कॉइन खरेदी करता येतात का ?