विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही आहे, याच अनुषंगाने शासनाकडून मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर हा बंधनकारक करण्यात आला आहे.

मात्र बेजबाबदार नागरिकांकडून सरकारच्या नियम पायदळी तुडविले जात आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाईसाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरली आहे. याचाच प्रत्यय राहुरी मध्ये आला आहे.

मास्कचा वापर करण्याचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या ७५ नागरिकांविरुद्ध शनिवारी दुपारपर्यंत राहुरी पोलिसांनी धडक कारवाई करत ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस अशोक कोळगे, पोलिस काॅन्स्टेबल महेंद्र गुंजाळ, दिगंबर सोनटक्के, सचिन लोंढे, सचिन ताजणे, प्रदीप अहिरे या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

नगर-मनमाड राज्य मार्गावरील जिजाऊ चौक, शहरातील नवीपेठ, शनिचौक, खळवाडीनाका या ठिकाणी थांबलेल्या पोलिस पथकाने विनामास्क वाहनावर फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून दंडात्मक कारवाई केली.

कोरोनाचे सावट असल्याने स्वत:ची व दुसऱ्याची सुरक्षितता जपण्यासाठी नागरिकांनी मास्कचा व सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग या शासनाच्या आदेशाचे पालन करण्याची गरज आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध राहुरी पोलिसांची कारवाई सुरू राहणार आहे. अशी माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News