अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.
यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी व त्यांची आई दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत ताकवाले यांच्याफिर्यादीवरून शालिनी देवंेद्र थोरात, संदीप थोरात (पूर्ण नाव माहित नाही) चुलत सासरा व अनोळखी इसम (सर्व रा. गेवराई तांडा. जि.औरंगाबाद) यांच्याविरूध्द पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास सफौ.गोल्हार हे करत आहेत.
- 5 वर्षात तब्बल 2.24 लाखांचा फायदा होणार! पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल
- 100 पासूनची गुंतवणूक देईल लाखोंचा परतावा, पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना एकदा बघाच!
- अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गंत गटबाजी उफाळली, कार्यकर्ता मेळाव्यास पदाधिकाऱ्यांसह आमदारांनाही फिरवली पाठ
- एकेकाळी भारतात छापली होती चक्क ‘0’ रुपयाची नोट ? कारण ऐकून चकित व्हाल!
- राहुरीमध्ये लग्नाच्या वरातीत नाचायल चल म्हणल्याच्या कारणावरुन तरूणाला बेदम मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल