राज्याच्या तिजोरीत भर; दारूतून कोटींचा महसूल गोळा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. यामुळे अनेक दिवस राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यावेळी अनेक उद्योग धंदे बंद ठेवण्यात आले होते.

यामुळे राज्याच्या महसुलात मोठी घट झाली होती. दरम्यान महसुलात वाढती घट व ढासळलेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी राज्याने दारूच्या दुकाने खुली केली होती. महसुलात भर पडावी यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता.

दरम्यान ‘कोरोनाच्या वाईट काळातही राज्य उत्पादन शुल्क विभागाने ( एक्साईज ) सरकारला मोठा हातभार लावला आहे. ‘कोरोना’ काळात या विभागाने दारूतून तब्बल 7565 कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळवून दिला आहे. एप्रिल ते 26 नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत हा महसूल जमा झाला आहे.

अर्थात ‘कोरोना’मुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा महसूल कमीच आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 9768 कोटी रुपये महसूल जमा झाला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2203 कोटी रुपये कमी महसूल जमा झाला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यातील महसूलात गेल्या वर्षापेक्षाही यंदा मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे उरलेल्या पाच महिन्यांत अशीच वाढ झाली तर मार्च अखेर एकूण 14 हजार कोटी रुपये महसूल प्राप्त होईल असा अंदाज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment