महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी -अ‍ॅड. भानुदास होले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. समाजाला दिशा देऊन दीपस्तंभाचे कार्य महात्मा फुले यांनी केले असल्याची भावना जिल्हा माळी सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले.

जिल्हा माळी सेवा संघ, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, जय युवा अकॅडमी, आधार बहुउद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान, उड्डाण फाऊंडेशन, रायझिंग युथ आदिवासी फाउंडेशन, नर्मदा फाउंडेशन, माहेर फाउंडेशन, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, नेहरू युवा केंद्र अहमदनगर, कासा मनुष्यबळ संस्था, द युनिव्हर्सल फाऊंडेशन आदींच्या सहयोगाने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. होले बोलत होते. शहराच्या गर्दीचे ठिकाण असलेले गाडगीळ पटांगण येथील भाजी मार्केटमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी जनजागृती करुन भाजी विक्रेते व बाजारात विना मास्क आलेल्या नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे,

अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, आरती शिंदे, रजनी ताठे, नयना बनकर, डॉ. वैशाली गिर्‍हे, सागर आलचेट्टी, सिमोन बनकर, पोपट बनकर, मेजर नारायण चिपाडे, किरण सातपुते, सूर्यकांत रासकर, सुनील गायकवाड, अ‍ॅड.सुनिल महाराज तोडकर, रमेश चिपाडे, डॉ.संतोष गिर्‍हे, सी.आर. मिस्त्री, एन.एस. वनवे, आर.बी. शिंदे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. अनिता दिघे यांनी सामाजिक बांधिलकी जपत संस्थांनी कृतिशीलपणे सामाजिक उपक्रम राबवून महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन केले. तर कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्क अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.

जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी थोर समाजसुधारकांच्या कार्यातून संस्था प्रतिनिधींनी प्रेरणा घेऊन कार्य केल्यास निश्‍चित परिवर्तन होईल व समाजात क्रांती घडणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक गणेश ढोले यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रणाली चव्हाण यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment