परभणी : विधान परिषदेत भाजपसह आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी एकावरही कारवाई केली नाही. राज्यातील १२ कोटी जनतेसमोर तुम्ही या अन् मीही येतो. पुरावे खोटे निघाल्यास जनतेसमोर मी फाशी घेईल, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले.
शहरातील श्रीकृष्ण गार्डन येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री फौजिया खान, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. विजय भांबळे,

आ. रामराव वडकुते, आ. मधुसुदन केंद्रे, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश विटेकर, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जि.प.उपाध्यक्षा भावना नखाते, सभापती अशोक काकडे, विजय जामकर, सोनाली देशमुख, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, किरण सोनटक्के, प्रसाद बुधवंत आदींची उपस्थिती होती.
मुंडे म्हणाले की, अमित शहा राज्यात शरद पवारांनी ७० वर्षांमध्ये काय केले, असे म्हणतात. तर मी म्हणतो पवारांनी राज्यात जेवढे विमानतळं बांधले तेवढे त्यांनी गुजरातमध्ये बसस्थानकसुद्धा करता आले नाही.
चार पाच नेते गेले म्हणजे राष्ट्रवादी पक्ष संपला असे भाजपाने समजू नये. जे आम्हाला संपावयाला निघाले त्यांना जनता संपविल्याशिवाय गप्प बसणार नाही.
मुख्यमंत्री एकप्रकारे राजकीय भ्रष्टाचार करून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, राज्यातील पुरोगामी जनता भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मातीत घातल्याशिवाय राहणार नाही.
- अहिल्यानगरमधील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला अखेेर सुरूवात, खासदार निलेश लंके आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश!
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ ! 17 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट पहा…
- अहिल्यानगरमधील आगामी निवडणुकीत अजित पवारांची ताकद चालणार का? शरद पवारांचा अनुभव सरस ठरणार? राष्ट्रवादीत कोण आहे पाॅवरफुल!
- वाईट काळ संपला ! 23 मे पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- अहिल्यानगर महापालिकेत नवीन प्रभाग वाढणार? प्रभाग फेररचनेमुळे विद्यमान नगरसेवकांची धास्ती वाढली