बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याची व्याप्ती ११०० कोटी रुपयांची – एकनाथ खडसे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप के्रडीट सोसायटी अर्थात बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह काहींनी गैरव्यवहार केला आहे.

या घोटाळ्याची व्याप्ती ही तब्बल ११०० कोटी रुपयांची असून यात बड्या मंडळींनी मातीमोल भावात बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता विकत घेतल्या असून यांची नावे पोलीस तपासात समोर येतीलच. यापूर्वी सन २०१८ मध्ये तक्रार केली होती.

त्यावेळी हे प्रकरण पध्दतशीरपणे दडपून टाकण्यात आले असून अगदी दिल्लीहून चौकशीचे दिलेले निर्देश सुध्दा पाळण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी मुक्ताई बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी किर्ती रवींद्र पाटील यांची देखील उपस्थिती होती. खडसे पुढे म्हणाले की, बीएचआर पतसंस्थेतील घोळ उघडकीस आल्यानंतर सन २०१७ साली आपण तक्रार केली होती. याप्रसंगी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले.

त्यानुसार आपण रक्षा खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार केली. राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधीत खात्याकडे तक्रार केली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपिण्यात आले. या प्रकरणी आपण वारंवार पाठपुरावा किर्ती पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment