जयपूर : जवळपास २० वर्षांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेल्वेची चेन खेचल्याप्रकरणी अभिनेता व खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर रेल्वे न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
परंतु दोघांनीही रेल्वेच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. १९९७ मध्ये ‘बजरंग’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली होती. अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सनी देओल आणि करिश्मा कपूरवर अपलिंक एक्स्प्रेसची चेन विनाकारण खेचल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे रेल्वेला जवळपास २५ मिनिटे उशीर झाला होता. याप्रकरणी २००९ मध्ये दोघांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र २०१० मध्ये याविरोधात दोघांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
सत्र न्यायालयाने २४ एप्रिल २०१० रोजी दोघांची या आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली होती; परंतु रेल्वे न्यायालयाने पुन्हा १७ सप्टेंबर रोजी दोघांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या निर्णयाला बुधवारी सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.