तरुण झाला ‘पबजी’ चा वेडा

Published on -

सोलापूर : मोबाईलमधील ‘पबजी गेम’चे दुष्परिणाम दररोज ऐकावयास मिळत असतानाही तरुणाई या गेमच्या आहारी जात आहे.

रात्रंदिवस हा गेम खेळत असल्याने सोनंद (ता. सांगोला) येथील एका २१ वर्षीय युवकाचे मानसिक संतुलन बिघडल्याचा प्रकार समोर आला असून त्याला सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ पालकांवर आली आहे.

सोनंद येथील हा युवक शेती व घरातील किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतर सतत पबजी ही गेम खेळत असायचा. रात्री उशिरा जागून आपल्या मित्रांसोबत ऑनलाईन पबजी गेम खेळत असे. सातत्याने या गेमच्या आहारी गेल्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News