बिहारच्या चोरट्यांना नगरमध्ये अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच रस्तालुटीच्या घटनांमध्ये देखील काही दिवसांपासून वाढ होत आहे. अशाच काही वाहनचालकांना लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

रस्त्यावर वाहनांचा पाठलाग करत वाहनचालकांची लुटमार करणाऱ्या बिहार येथील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी मोहम्मद रियाज मनेसुरी, मोहम्मद नसरुद्दिन मनेसुरी व आरिफ हसन शेख रा. बिहार असे अटक केलेल्या तीन जणांची नावे आहेत.

या तिघांना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या तीन जणांनी २८ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास जेऊर बायजाबाई रोडवरील पेट्रोल पंपाजवळ हौशीराम सूर्यभान बर्डे (रा. आडगाव ता. पाथर्डी) या पिकअप चालकाला अडवून मारहाण करीत त्याला लुटले होते.

त्यानंतर बर्डे यांनी आरडाओरडा केला तेव्हा तेथील नागरिक धावून आले. यावेळी पोलीस व नागरिकांनी दोघांना ताब्यात घेतले. व त्यानंतर त्याच्या साथीदाराला अटक केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment