रेखा जरे खून प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असेही वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जरे यांच्या सॅन्ट्रो कारला दुचाकी आडवी घालून त्यांच्या हुज्जत घालीत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करणार्‍या दोघांपैकी एका संशयिताचे छायाचित्र नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने प्रसिद्ध केले असून संबंधित व्यक्तिबाबत कोणासही काही माहिती असल्यास त्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.

खूनामागील नेमक्या कारणांचा अद्यापही उलगडा झालेला नसून पोलीस सर्व शक्यता पडताळून बघत आहेत. सदरचे प्रकरण ‘अन्य’ कारणाने घडले का? याचीही सखोल तपासी सुरु आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment