अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी अकोले रोडवर करण्यात आली.
दुचाकीवर अवैध गुटखा वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळताच अकोले नाका येथे पथक पाठवून कारवाई करण्यात आली. गोपाळ एकनाथ राठी (४०, साईश्रद्धा चौक) याला अकोले रोडवरील मालपाणी कंपनीच्या गेटसमोर पोलिसांनी पकडले.
त्याच्याकडून ४८०० रुपये किमतीचे हिरा कंपनीचा पानमसाला, १२०० रुपयाची रॉयल तंबाखू व ३० हजार रुपयाची दुचाकी (एमएच १६, बीटी १६९१) पोलिसांनी जप्त केली.
नरसय्या रामदास पगडाल (५६, पद्मानगर) याला अकोले नाका भराडवस्तीजवळ पकडण्यात आले. त्याच्या जवळून ६४८० किमतीचा हिरा कंपनीचा पानमसाला, १६२० रुपयाची रॉयल तंबाखू व ३० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १७, एवाय ५४६) जप्त करण्यात आली.
कॉन्स्टेबल सुरेश बाळू मोरे, अविनाश अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांत शहर पोलिसांनी २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved