रस्तारोको करत शेतकरी आंदोलन तीव्र करणार; यांनी दिला इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून देशभर कृषी कायद्यावरून आंदोलने पेटली आहे. शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातच या मुद्यावरून नगर जिल्ह्यामध्ये देखील निदर्शने करण्यात आली आहे. आता हि आंदोलने तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आल्याचे किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले यांनी सांगितले आहे.

जनसंघटनांची समन्वय समितीची ऑनलाईन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने मंगळवारी पार पडली. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकार बळाच्या जोरावर आंदोलने दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे.

त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत ३ डिसेंबरला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रस्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe