अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-राज्यातील ठकरे सरकारने युती सरकारच्या काळातील महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार बाबत चौकशीचे आदेश दिले आहे. या योजनेच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी जल संसाधन मंत्री राम शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे, याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
यावर आता माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सडकून टीका केली आहे.ते म्हणाले की जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र तरीही त्या योजनेची चौकशी केली जाते आहे. आकस बुद्धीने किंवा सूड बुद्धीने चौकशी केली जाते आहे,” असा आरोप जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
जलयुक्त शिवार योजनेत कॅगने भ्रष्टाचार केला, असे म्हटलेलं नाही. पण खर्च काय झाला याबाबतच्या सूचना दिल्या आहे. या योजनेत स्थानिक पातळीवर पूर्ण सहभाग होता. ठाकरे सरकारने आकसबुद्धीने ही चौकशी केली. तरी त्यात काही निष्पन्न होणार नाही,” विश्वासही राम शिंदेंनी व्यक्त केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved