कोणी पैसे मागितले, तर मला कळवा, कारवाई करण्यात येईल, आमदार पवारांचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-घरकुल योजना गरजूंसाठी आहे. या योजनेसाठी पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली. घरे पूर्ण करण्यासाठी कमिशन देण्याची गरज नाही.

कोणी पैसे मागितले, तर मला कळवा, कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार पवारांनी बुधवारी बैठक घेतली.

नगराध्यक्ष निखिल घायतडक, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विकास राळेभात, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, राजेश वाव्हळ, महेश निमोणकर, गुलशन अंधारे, पवन राळेभात, मोहन पवार, भाऊराव राळेभात, प्रधानमंत्री अवास योजनेचे अभियंते अनंत शेळके, किरण भोगे यावेळी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, जामखेड नगरपालिकेच्या ९३३ लाभार्थ्यांच्या घरकुल प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्याचे ११ कोटी १९ लक्ष ६० हजार अनुदान नुकतेच वितरित करण्यात आले आहे. आता लाभार्थींनी तातडीने बांधकामाची परवानगी घेऊन आपल्या घरांची राहिलेली कामे पूर्ण करावीत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment