समाजकारणालाच जास्त महत्त्व देतो : सुजित झावरे

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- विकासनिधीच्या माध्यमातून विकासाभिमुख कामे करणे हेच आपले उद्दिष्ट असून राजकारणापेक्षा आपण समाजकारणाला महत्त्व देत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील देवीभोयरे गावठाण ते तुकाईवाडी मगरदरा रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. या वेळी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, ॲड. बाबासाहेब खिलारी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव बेलोटे, लहू भालेकर, नंदू भालेकर, मोहनराव रोकडे, तुकाराम बेलोटे, शिवाजी बेलोटे, अशोक मुळे, विठ्ठलराव सरडे, संपतराव वाळुंज, सुभाष बेलोटे, जयंतराव मुळे, सीताराम बेलोटे, साठे गुरुजी, आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment