अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे गुरुवारी पहाटे भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.
शेजारील पिंजऱ्या ऐवजी मुख्य पिंजऱ्यात च बोकड भक्ष्य ठेवण्याची वन विभागाची युक्ती कमालीची परिणामकारक ठरली.बुधवारी सायंकाळी पान तास वाडी घाट शिरस रस्त्यावर चैतन्य नगर भागातील रहिवासी खलील दाऊबा शेख यांचे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली.
त्या शिकारी चा झाडा झुडपातील माग काढत तिसगाव वन परिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांनी ठसे घेतले.त्यानुसार बिबट्या वावर हेरून पिंजरा लावला.नैसर्गिक छपरा प्रमाणे पिंजरा भक्ष ठेवून पाल्या पाचोळ्यानी पिंजरा झाकला.
गुरुवारी दैनंदिन पाहणी करताना बिबट्या जेरबंद झाल्याचे आढळून आले.सकाळी आठ वाजता शेरी मळ्यातील अर्जुन मरकड यांचे शेत तलाव जवळील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती सार्वत्रि…
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved