मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत.
हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.
आरोपींत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याचा तपास मुंबई अन्वेषण विभागाच्या आर्थिक घोटाळा शाखेचे अधिकारी करीत आहेत.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..