अहमदनगर : मनोज दुल्लम याने युवकास विनाकारण लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना सावेडीतील कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेलसमोर घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुल्लमविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सागर अरुण घोरपडे (वय २५, रा.लालटाकी, नगर) हा युवक जखमी झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कुष्ठधाम रोडवरील अजिंक्य हॉटेल येथे मनोज दुल्लम याने विनाकारण सागर घोरपडे यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या मारहाणीत घोरपडे यांच्या डाव्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सागर घोरपडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार केदार हे करीत आहेत.
- कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा : आ. रोहित पवार यांच्या पुढाकाराने सीना कालव्याचे आवर्तन सुरू होणार
- मुंबईहुन नाशिक फक्त अडीच तासात, ‘हा’ महत्वाचा एक्सप्रेस वे ठरणार गेमचेंजर
- AMC News : अहिल्यानगर करांनी करून दाखवलं ! सीना नदी होतेय स्वच्छ…
- मोठी बातमी ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 2-3 टक्के नाहीतर चक्क 5 टक्क्यांनी वाढणार, पहा…..
- रोहित पवारांना धक्का ! कर्जत नगराध्यक्षपदासाठी नव्या निवडीची घोषणा