अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तेच पर्यटनासाठी खुले करून तिथे आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे.
ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी तळपायच्या त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

दरम्यान, आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली जाईल, त्यासाठी ‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा, असे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत माझे नाव घेऊन टीका करतात. झोपेतही ते हेच बडबडत असतील. स्वतः त्यांनी काय दिवे लावले हे सांगत नाहीत, असा टोला लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवार यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप सरकारवर चौफेर टीका केली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, निरीक्षक अंकुश काकडे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, राहुल जगताप, जयदेव गायकवाड, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, पांडुरंग अभंग, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विठ्ठल लंघे,
महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, संदीप वर्पे, माजी महापौर अभिषेक कळमकर, अविनाश आदिक, अब्दुल गफार, माणिक विधाते, डॉ. सर्जेराव निमसे, निर्मला मालपाणी आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
- रोज आवडीने इन्स्टंट नूडल्स खाताय?, मग ही बातमी नक्की वाचा! सत्य ऐकून हादरून जाल
- जपान दरवर्षी 2000 भूकंपांना कसा तोंड देतो?, ‘या’ 10 गोष्टींमुळे हा देश अजूनही सुरक्षित! मजबूत यंत्रणेचं जगभर होतं कौतुक
- महाराष्ट्रातील ‘या’ 3 राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु
- न बोलताही भावना ओळखतात, लोक आपोआप त्यांच्यासमोर मन मोकळं करतात! अंक 2 चे लोक इतके खास का असतात?
- मेकअप करण्यापूर्वी चुकूनही गुलाब जल लावू नका, चुकीच्या पद्धती त्वचेला पोहोचवतात हानी! जाणून घ्या योग्य वापर