अहमदनगर जिल्ह्यातील कालिदास बनकर यांना करोडपती विमा प्रतिनिधी पुरस्कार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विमा प्रतिनिधी कालिदास ज्ञानदेव बनकर यांची करोडपती विमाप्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे .

भारतीय आयुर्विमा महामंडळा तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कालिदास बनकर यांना प्राप्त झाला आहे .त्यांनी आपल्या कार्यकाळात पुणे व नगर जिल्हयात उत्कृष्ट काम करून पहिल्याच वर्षी हा पुरस्कार प्राप्त करून नवीन विक्रम केला आहे.

मिलियन डॉलर राउंड टेबल सदस्यपदी निवड होऊन अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी त्यांची निवड झाली आहे.त्यांनी एम. बी. ए मार्केटिंग करून विमा क्षेत्रात पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट काम करून यश मिळवले विकास अधिकारी आर.व्ही.हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe