अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
बिबट्याच्या हल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील शेगुडजवळ फुंदेवाडी येथील एका ३५ वर्षीय तरुणावर बिबट्याने गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हल्ला केला.
त्यास नजीकच्या शेतात ओढत नेत ठार केले. या घटनेची माहिती समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याने तरुणावर हल्ला करत त्याला ओढून नेले. त्यांनतर तातडीने तरुणाचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम सुरु केली. काही वेळांनंतर संबंधित व्यक्तीचे रक्त आढळून आले व काही वेळानंतर मृतदेह आढळून आला.
कल्याण फुंदे असे मयत युवकाचे नाव असल्याचे समजते. फुंदेवाडी येथे युवकावर हल्ला झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली होती. दरम्यान कर्जत- करमाळा रस्त्यालगतच्या राधेश्याम मंगल कार्यालयाजवळ रात्री ९ वाजता बिबट्या आढळला असून तो कोरेगावच्या दिशेने गेल्याची माहिती महेश जगताप यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved