मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व अशा पद्धतीच्या निकषांवर साधारण २५ आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यात नेमका कोणाचा नंबर लागणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

विधानसभेच्या या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना ‘युती’कडून होणार आहे. सुरुवातीच्या काळात हे दोन्ही पक्ष ‘स्वबळा’वर लढतील असे राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. पण, महायुती करूनच मोठा विजय मिळविण्याचे भाजपने नक्की केले आहे.
अशा परिस्थितीत महायुतीला महाराष्ट्रात २२९ जागा मिळतील असा ‘सर्व्हे’ सांगतो. प्रत्यक्षात यश कितपण मिळेल याचा शेवटी हा अंदाजच आहे. पण, अशा आकडेवारीवरून विरोधकांना खच्ची करण्याचा एकही प्रयत्न भाजप सोडणार नाही, असे सांगण्यात येते.
- गुप्तपणे रेकॉर्ड केलेले नवरा-बायकोचे कॉल आता कायदेशीर ! घटस्फोटाच्या खटल्यात मोठा बदल
- अकोलेत सापडलेल्या १ कोटीच्या गुटख्याचा मास्टरमाइंड निघाला अहिल्यानगर शहरातला…‘डॉन’ने पोलिसांना चकवा देण्यासाठी रचली भन्नाट योजना!
- भगवानगड झाला ‘वटवृक्षांचं देवस्थान’ ! सर्वाधिक वटवृक्ष असलेलं देवस्थान होणार भगवानगड! काय आहे या मागचं उद्दिष्ट ?
- महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 15% प्रोत्साहनपर भत्ता, थकबाकीचाही लाभ मिळणार
- कष्टाने पिकवलेला भाजीपाला… शेवटी रस्त्यावर ! पाथर्डीतील शेतकऱ्यांची व्यथा