औरंगाबाद : मध्यान्ह भोजनावेळी हृदयविकाराच्या झटक्याने येथील जिल्हा परिषद प्रशालेतील सहशिक्षक देविदास नामदेव पवार (४८) यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२०) घडली. मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
एकाच दिवशी आई आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी येथील मूळचे असलेले पवार कुटुंब सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. शिऊर येथील जिल्हा परिषद शाळेत पवार सहशिक्षक म्हणून कार्यरत होते.

दुपारी मध्यान्ह भोजनावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मृतदेह पाहताच हा धक्का सहन न झाल्याने अंजनाबाई नामदेव पवार (७२) यांचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान, देविदास पवार यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
- तुम्हीही दररोज RO पाणी पिताय?, मग ही बातमी वाचाच; आरोग्याबाबत WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा!
- फक्त 20 रुपयांत मिळवा तब्बल 2 लाखांचा विमा, जाणून घ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सर्व फायदे!
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार विमानासारखी बस, प्रवाशांना मिळणार विमान प्रवासासारख्या सोयीसुविधा, नितीन गडकरींची माहिती
- ‘ह्या’ 7 स्टेप्स फॉलो करा, 15 वर्षे जुना फ्रीज पण नव्यासारखा काम करणार !
- जगात सर्वाधिक चलनी नोटा छापणारा देश कोणता?, भारताच्या या शत्रू राष्ट्राने ब्रिटन-अमेरिकेलाही टाकलं मागे!