कौतुकास्पद! कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था सरसावल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अहमदनगर गेल्या अनेक महिन्यांपासून मानवजातीवर आलेलं कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

यातच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढतो आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक संस्था सामाजिक जाणिवेतून पुढे आल्या आहेत. आता अकोले मध्ये डॉ.भांडकोळी यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या शासकीय कोव्हीड हॉस्पिटल साठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने अमृतसागर दूध संघाने 25 कोरोना रुग्णांसाठी दोन वेळेस जेवणाची सोय,

दोन वेळेस चहा व एकवेळ नास्ता याची सोय करून महत्वाचे पाऊल उचललेले आहे. त्यांनंतर डॉ.मारुती भांडकोळी व डॉ.ज्योती भांडकोळी यांनी स्वतःच्या मालकीच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 25 बेडस ची सुविधा मोफत करून दिली आहे.

अगस्ति सह साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजीमंत्री मधुकरराव पिचड, उपाध्यक्ष सीताराम पा.गायकर व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने अगस्ति सह साखर कारखान्याचे वतीने विठ्ठल लॉन्स येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment